मराठी माणसांचे स्वतंत्र राज्य म्हणजे आपल्या महाराष...
मराठी माणसांचे स्वतंत्र राज्य म्हणजे आपल्या महाराष्ट्राची निर्मिती झाली तो हा दिवस अर्थात महाराष्ट्र दिन. यानिमित्ताने संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात बलिदान दिलेल्या हुतात्म्यांचे कृतज्ञ स्मरण.

यासोबतच महाराष्ट्राचा व देशाचा सन्मान देश आणि आंतराष्ट्रीय पातळीवर वाढविण्यासाठी अपरिमित कष्ट घेणाऱ्या कामगारांनाही सलाम करण्यासाठी हा दिवस कामगार दिन म्हणूनही ओळखला जातो.त्यांच्या योगदानाचे कृतज्ञ स्मरण करुया.
महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी अनेक शुर-विरांनी आपलं बलिदान दिलं. त्यांचं स्मरण करून महाराष्ट्राला लाभलेला समृद्ध वारसा जपत महाराष्ट्राचा विकास साधण्यासाठी कटिबद्द राहूयात.

सर्वांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
May 1st, 2025 2:22 PM

Keywords