+918048033826
Currently it only shows your basic business info. Start adding relevant business details such as description, images and products or services to gain your customers attention by using Boost 360 android app / iOS App / web portal.
पीसीओडीपासून दूर राहण्यासाठी करा जीवनशैलीत काही आवश्यक बदल (Essential Changes In Lifestyle) जीवनशैलीत आवश्यक बदल करून आणि संतुलित आहार, नियमित व्यायाम करून तुम्ही या समस्येपासून सुटका नक्कीच मिळवू शकता. नियमित व्यायाम करा (Exercise Regularly) नियमित व्यायाम आणि योगासने केल्यास तुमच्या संपूर्ण शरीरावर त्याचा चांगला परिणाम होतो. नियमित व्यायाम केल्यामुळे तुम्ही फिट राहता. तुमचे मासिक चक्र नियमित होते. हॉर्मोन्सचे कार्य सुरळीत होते. त्यामुळे पीसीओडी आणि इतर आरोग्य समस्या टाळण्यासाठी दिवसभरात कमीत कमी तीस मिनीटे व्यायाम अवश्य करा. संतुलित आहार (Balanced Diet) योग्य आणि संतुलित आहार घ्या. घरातील सात्विक आणि ताजे अन्न खाणे नेहमीच चांगले. शिवाय आहारात ताज्या भाज्या आणि फळांचा समावेश करा. जेवणात वरून मीठ टाकल्यामुळे अथवा चिप्स अथवा प्रक्रिया केलेले पदार्थ अतीप्रमाणात खाल्यामुळे शरीरात सोडीयमचे प्रमाण वाढू शकते. ज्यामुळे तुमच्या हॉर्मोन्सच्या कार्यात अडथळा येतो.आहारात व्हिटॅमिन Ca, B12, D3 या सप्लीमेंटचे प्रमाण वाढवा. Stress, ताणतणाव, मद्यपान आणि धूम्रपान टाळा मद्यपान आणि धूम्रपानाचा शरीरावर विपरित परिणाम होतो हे माहित असूनही अनेक लोक या व्यसनांच्या आहारी जातात. शिवाय फॅशन म्हणून अथवा थ्रील म्हणून अनेकजणी धूम्रपान आणि मद्यपान करतात. मात्र जर तुम्हाला संपूर्ण निरोगी आयुष्य हवे असेल तर मद्यपान आणि धूम्रपानापासून दूर रहा. व्यसन सोडण्यासाठी थोडासा प्रयत्न केल्यास तुमचा नक्कीच चांगला फायदा होऊ शकेल. संपूर्ण निरोगी आयुष्यासाठी व्यसनांपासून दूर राहणे हे नेहमीच चांगले. जेव्हा तुम्ही व्यसनांच्या आहारी जाता तेव्हा पीसीओडीप्रमाणे अनेक आरोग्य समस्यांना तुम्हाला सामोरं जावं लागतं. अधिक माहिती साठी आणि उपचारासाठी भेट द्या, त्रि॑बके हॉस्पिटल कॉटेज हॉस्पिटल जवळ, स्टेशन रोड, कराड संपर्क - +91 84080 67474